पंतप्रधान कार्यालय
नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल नानाजी देशमुख यांचा आदर आणि राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या दूरदृष्टीचे पंतप्रधानांनी केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2025 11:22AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन एक दूरदर्शी समाजसुधारक, राष्ट्रनिर्माता तसेच स्वावलंबन आणि ग्रामीण सक्षमीकरणाचे आजीवन पुरस्कर्ते अशा शब्दांत केले. नानाजी देशमुख यांचे जीवन समर्पण, शिस्त आणि समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याकडून नानाजी देशमुख यांना मिळालेल्या प्रेरणेवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. जनता पक्षाचे महामंत्री असताना त्यांनी दिलेल्या संदेशात नानाजींचा जेपींबद्दलचा आदर आणि युवा विकास, सेवा आणि राष्ट्र उभारणीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टच्या मालिकेत म्हटले आहे की;
"महान व्यक्तिमत्वाचे धनी नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. ते एक दूरदर्शी समाजसुधारक, राष्ट्रनिर्माता तसेच स्वावलंबन आणि ग्रामीण सक्षमीकरणाचे आजीवन पुरस्कर्ते होते. त्यांचे जीवन समर्पण, शिस्त आणि समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक होते."
“नानाजी देशमुख हे लोकनायक जेपींपासून अत्यंत प्रेरित होते. जनता पक्षाचे महामंत्री असताना त्यांनी दिलेल्या या संदेशातून जेपींबद्दलचा त्यांचा आदर आणि युवा विकास, सेवा आणि राष्ट्र उभारणीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो.
* * *
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177718)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam