पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्ही.के. मल्होत्रा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2025 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत व्ही.के. मल्होत्रा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आज श्रद्धांजली अर्पण केली.त्यांनी मल्होत्रा यांच्या शोकाकुल कुटुंबियांचेही सांत्वन केले.
व्ही.के. मल्होत्रा यांच्या योगदानाचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले, की दिल्लीच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण कायमच केले जाईल.
एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले;
“दिवंगत व्ही.के. मल्होत्रा जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिल्लीच्या विकासात आणि आमच्या पक्षाच्या सुशासनाच्या धोरणाला पुढे नेण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील”.
* * *
निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2173140)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam