पंतप्रधान कार्यालय
तंत्रज्ञान हा भारताचा सर्वात मोठा समतोल साधणारा घटक आहे हे दाखवून देणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2025 12:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
रस्त्यावरील सामान्य विक्रेता ते कॉर्पोरेट विश्वात कार्यरत अधिकारी अशा प्रत्येकाला सक्षम करत तंत्रज्ञान कशा प्रकारे भारताचा सर्वात मोठा समतोल साधणारा घटक ठरला आहे हे दाखवून देणारा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. “इंडिया स्टॅक, युपीआय, जेएएम त्रिसूत्री , कोविन, नवोन्मेष तसेच समावेशन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे, प्रशासनात सुधारणा झाली आहे आणि जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका अधिक बळकट झाली आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणतात:
“केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw लिहितात की, रस्त्यावरील सामान्य विक्रेता ते कॉर्पोरेट विश्वात कार्यरत अधिकारी अशा प्रत्येकाला सक्षम करत तंत्रज्ञान हा भारताचा सर्वात मोठा समतोल साधणारा घटक ठरला आहे. इंडिया स्टॅक, युपीआय, जेएएम त्रिसूत्री आणि कोविन , नवोन्मेष तसेच समावेशन यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे, प्रशासनात सुधारणा झाली आहे आणि जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका अधिक बळकट झाली आहे.”
* * *
सुषमा काणे/संजना चिटणी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168437)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam