पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्ती : मॉरीशसच्या पंतप्रधानांचा भारत दौरा

Posted On: 11 SEP 2025 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025

अनुक्रमांक

सामंजस्य करार/करार

1.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि मॉरीशस प्रजासत्ताकाचे तृतीयक शिक्षण, विज्ञान आणि संशोधन मंत्रालय यांच्यादरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार

2.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि मॉरीशस सागरशास्त्र संस्था यांच्यात सामंजस्य करार

3.

केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील कर्मयोगी भारत मंच आणि मॉरीशसचे सार्वजनिक सेवा तसेच प्रशासनिक सुधारणा मंत्रालय यांच्या दरम्यान सामंजस्य करार

4.

उर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

5.

छोट्या विकास प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय अनुदान साहाय्य  संबंधित सामंजस्य करार  

6.

जलमापचित्रणक्षेत्रातील सामंजस्य कराराचे नूतनीकरण

7.

उपग्रह आणि प्रक्षेपक वाहने यांच्याकरिता टेलीमेट्री, ट्रॅकींग तसेच दूरसंचार केंद्राच्या स्थापनेसाठी सहकार्याबाबत आणि अवकाश संशोधन, विज्ञान आणि उपयोजन या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भारत सरकार आणि मॉरीशस सरकार यांच्या दरम्यान करार

घोषणा

1. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास आणि रेडवी येथील मॉरीशस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

2. बेंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंट आणि मॉरीशस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

3. तमारिंड  फॉल्स येथे 17.5 मेगावॉट क्षमतेच्या तरंगत्या सौर पीव्ही प्रकल्पाच्या उभारणीसाठी जी2जी म्हणजेच दोन्ही सरकारांच्या दरम्यानच्या प्रस्तावाची कार्यवाही पुढे नेणे. एनटीपीसीचे एक पथक या संदर्भात सीईबीसोबतच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी लवकरच मॉरीशसला भेट देईल.

सोनाली काकडे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165790) Visitor Counter : 2