पंतप्रधान कार्यालय
79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणात आपल्या देशाच्या सामूहिक प्रगतीचा आणि भविष्यातील संधींचा उल्लेख : पंतप्रधान
Posted On:
14 AUG 2025 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेले विचारप्रवर्तक भाषण सामायिक केले. राष्ट्रपतींच्या या भाषणात आपल्या देशाची सामूहिक प्रगती आणि भविष्यातील संधी तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला करण्यात आलेले आवाहन पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपतीजींनी एक विचारप्रवर्तक भाषण केले आहे, या भाषणात त्यांनी आपल्या देशाची सामूहिक प्रगती आणि भविष्यातील संधींवर प्रकाश टाकला आहे. राष्ट्रपतींनी भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या वीरांच्या बलिदानांची आठवण करून दिली आणि प्रत्येक नागरिकाने राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन केले.
@rashtrapatibhvn"
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156651)