पंतप्रधान कार्यालय
फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त पंतप्रधानांनी फाळणीमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या साहस आणि धैर्याला अभिवादन केले
Posted On:
14 AUG 2025 1:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या इतिहासातील सर्वात दुःखद अध्यायांपैकी एक असलेल्या फाळणीच्या काळात अगणित लोकांच्या आयुष्यात झालेली प्रचंड उलथापालथ आणि त्यांना सोसाव्या लागलेल्या वेदना, यांचे स्मरण केले.
फाळणीची वेदना सहन केलेल्यांमध्ये अकल्पित हानी सोसण्याची सहनशक्ती आणि पुन्हा आपले जीवन उभे करण्याची शक्ती याप्रती आदर व्यक्त करत पंतप्रधानांनी फाळणीमुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या साहस आणि धैर्याला अभिवादन केले.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:
''भारत इतिहासातल्या दुःखद अध्यायाच्या काळात अगणित लोकांनी सोसलेली उलथापालथ आणि वेदनेचे स्मरण करत आजचा दिवस #PartitionHorrorsRemembranceDay फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळतो. हा त्यांच्या साहसाचा सन्मान करण्याचाही दिवस आहे, अकल्पित हानी सोसण्याची सहनशक्ती आणि तरीही पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे सामर्थ्य मिळवण्याची त्यांची क्षमता यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. प्रभावित झालेल्या अनेक लोकांनी आपले जीवन पुन्हा उभे केले आणि उल्लेखनीय यश प्राप्त केले. हा दिवस आपल्या देशाला एका सूत्रात बांधणाऱ्या सद्भावाचे बंध अधिक दृढ करण्याच्या आपल्या चिरंतन जबाबदारीचे स्मरणही करून देतो.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156347)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam