पंचायती राज मंत्रालय
नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 210 पंचायत प्रतिनिधी विशेष अतिथी म्हणून होणार सहभागी
79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित टूल "सभासार" चे होणार अनावरण; पंचायत नेत्यांचा होणार सत्कार
Posted On:
13 AUG 2025 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
नवी दिल्लीत 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंचायत राज मंत्रालयाने 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेले 210 पंचायत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सहचारी आणि नोडल अधिकाऱ्यांसह एकूण 425 जण या उत्सवात सहभागी होणार आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 15 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथे या विशेष अतिथींचा औपचारिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राजमंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग आणि केंद्रीय पंचायती राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील. “आत्मनिर्भर पंचायत, विकसित भारताची ओळख", ही यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना असून या माध्यमातून विकसित भारताचा आधारस्तंभ म्हणून स्वयंपूर्ण पंचायती हे चित्र समोर येते. या सत्कार समारंभात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सभासार अॅप्लिकेशनचे अनावरण आणि ग्रामोदय संकल्प मासिकाच्या 16 व्या अंकाचे प्रकाशन यांचा समावेश असेल.
या वर्षीच्या विशेष पाहुण्यांमध्ये महिला पंचायत नेत्यांचा समावेश आहे ज्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये उत्तम पायाभूत सुविधा, सुधारित सार्वजनिक सेवा आणि समावेशक समुदाय उपक्रम यासारख्या दृश्यमान सुधारणा घडवून आणल्या आहेत. पंचायती राज संस्थांमधील (PRIs) निर्वाचित महिला प्रतिनिधी(EWRs) म्हणजे नव्याने उदयाला येणाऱ्या ग्रामीण नेतृत्वाच्या सामर्थ्याचे उदाहरण आहेत, देशभरात विविध प्रदेशांमध्ये कार्यरत असणाऱ्या या महिला प्रतिनिधी त्यांच्या प्रशासनात्मक जबाबदाऱ्या आणि भविष्यकालीन विकास दृष्टिकोन यांची यशस्वी सांगड घालत आहेत. त्यांनी हर घर जल योजना, प्रधान मंत्री आवास योजना - ग्रामीण, मिशन इंद्रधनुष्य अशा महत्वाकांक्षी सरकारी योजनांना पूरक ठरविण्यात लक्षणीय यश मिळवले असून तसेच तळागाळात नाविन्यपूर्ण स्थानिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात त्या आघाडीवर आहेत.

* * *
सोनल तुपे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156127)
Read this release in:
English
,
Hindi
,
Punjabi
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam