गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत आज आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी तिरंगा फडकावला.

Posted On: 13 AUG 2025 11:08AM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत आज आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी तिरंगा फडकावला.

एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी लिहिले :

देशाला एकतेच्या भावनेने बांधण्यासाठी तसेच राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु झालेल्या  'हर घर तिरंगा' मोहिमेने आता जनचळवळीचे रूप घेतले आहे. अगणित स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या त्याग, साधना आणि समर्पण भावनेने ज्या स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार केले होते, त्या भारताला विकसित आणि सर्वश्रेष्ठ बनवण्याचा दृढनिश्चय 140 कोटी देशवासीयांनी केल्याचे या मोहिमेतून दिसून येते.

***

SonalTupe/BhaktiSontakke/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155977)