पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मलेशियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2025 5:13AM by PIB Mumbai
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो मध्ये 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान महामहिम अन्वर बिन इब्राहिम यांची भेट घेतली.
ऑगस्ट 2024 मध्ये मलेशियाच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीपासून भारत आणि मलेशियामधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला. यात व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यटन आणि लोकांमधील संपर्क या क्षेत्रांचा समावेश होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल पंतप्रधान इब्राहिम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले. दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय क्षेत्र आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्यावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी आसियानच्या यशस्वी नेतृत्वासाठी मलेशियाचे अभिनंदन केले आणि आसियान-भारत मुक्त व्यापार कराराच्या पुनरावलोकनाच्या जलद आणि यशस्वी पूर्ततेसह आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीला बळकटी देण्यासाठी मलेशियाच्या सहकार्याचे स्वागत केले.
***
NilimaC/HemangiiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142803)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam