पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बुएनोस आयर्समध्ये जनरल होसे द सान मार्टिन यांना केले अभिवादन

Posted On: 06 JUL 2025 12:08AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुएनोस आयर्स येथे जनरल होसे द सान मार्टिन यांना अभिवादन केले. अर्जेंटिनाच्या जनतेसाठी जनरल होसे द सान मार्टिन यांचे जीवन हे देशभक्ती व दृढ निश्चयाचे प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी 'एक्स'वर पोस्ट केले

"बुएनोस आयर्समध्ये जनरल होसे द सान मार्टिन यांना अभिवादन केले. त्यांच्या शौर्य आणि नेतृत्वाने अर्जेंटिनाच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली. त्यांचे जीवन आजही अर्जेंटिनाच्या जनतेसाठी देशभक्ती आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे."

***

S.Pophale/N.Gaikwad/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2142659)