पंतप्रधान कार्यालय
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2025 9:45AM by PIB Mumbai
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या या मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जनतेच्या दृष्टीने विशेष सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सोहरीच्या पानात जेवण वाढण्यात आले.
एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणालेः
" त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जनतेच्या दृष्टीने विशेषतः भारतीय मूळ असलेल्या जनतेसाठी विशेष सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सोहरीच्या पानात जेवण वाढण्यात आले. या ठिकाणी उत्सव आणि इतर विशेष कार्यक्रमांच्या वेळी नेहमीच या पानांवर जेवण वाढण्यात येते. "
***
JPS/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142098)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam