पंतप्रधान कार्यालय
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सरकारी दौऱ्यासाठी पंतप्रधान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल
Posted On:
04 JUL 2025 4:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 जुलै 2025 रोजी नियोजित त्रिनिदाद आणि टोबॅगो (T&T) प्रजासत्ताकाच्या सरकारी दौऱ्यासाठी आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाले. 1999 नंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पाहिला द्विपक्षीय दौरा आहे. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून, पोर्ट ऑफ स्पेन येथील विमानतळावर आगमन झाल्यावर, पंतप्रधानांचे त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसर, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि इतर अनेक मान्यवरांनी स्वागत केले. पंतप्रधानांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
हॉटेलमध्ये आगमन झाल्यावर, या देशातील अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधानांचे अतिशय उत्साहात स्वागत केले.
***
JPS/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2142092)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam