रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे विभागाने 1 जुलै 2025 पासून प्रवासी रेल्वे सेवेसाठी मुलभूत प्रवासशुल्काचे केले सुयोजन


सामान्य वर्गासाठी 500 किमी पर्यंतच्या प्रवास शुल्कात कोणतीही वाढ नाही; 501 ते 1500 किमीच्या प्रवासासाठी 5 रुपये भाडेवाढ, 2500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपयांची भाडेवाढ तर 2501 ते 3000 किमीच्या टप्प्यातील प्रवासासाठी 15 रुपयांची भाडेवाढ

Posted On: 30 JUN 2025 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2025

 

शुल्करचनेमध्ये सुरळीतता आणण्याच्या तसेच प्रवासी सेवेतील वित्तीय शाश्वतता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवेच्या मुलभूत शुल्काचे सुयोजन केले आहे. हे बदल उद्या, 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. सुधारित प्रवास शुल्क भारतीय रेल्वे विचारविनिमय संघटनेने (आयसीआरए) जारी केलेल्या अद्ययावत प्रवास शुल्क तक्त्यावर आधारित आहे.

प्रवास भाडे सुयोजनाची ठळक वैशिष्ट्ये (1 जुलै 2025 पासून लागू):

उपनगरीय एक दिशा प्रवासी भाडे आणि सिझन तिकिटांच्या (पास) भाड्यामध्ये (उपनगरी आणि बिगर उपनगरी मार्गांवरील) कोणताही बदल केलेला नाही.

सामान्य बिगर-वातानुकूलित वर्गांसाठी (बिगर-उपनगरी रेल्वेगाड्या):

  • दुसरा वर्ग : खालील संदर्भात प्रत्येक किमी अंतरामागे अर्धा पैशाची वाढ
    • 500 किमी पर्यंत शुल्कात कोणतीही वाढ नाही
    • 501 ते 1500 किमीच्या प्रवासासाठी 5 रुपये भाडेवाढ
    • 1501 ते 2500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपयांची भाडेवाढ
    • 2501 ते 3000 किमीच्या टप्प्यातील प्रवासासाठी 15 रुपयांची भाडेवाढ
  • शयनयान वर्ग : प्रत्येक किमी अंतरामागे अर्धा पैशाची वाढ
  • प्रथम वर्ग : प्रत्येक किमी अंतरामागे अर्धा पैशाची वाढ

मेल/एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी (बिगर-वातानुकूलित):

  • दुसरा वर्ग: प्रत्येक किमी अंतरामागे एका पैशाची भाडेवाढ
  • शयनयान वर्ग: प्रत्येक किमी अंतरामागे एका पैशाची भाडेवाढ
  • थम वर्ग: प्रत्येक किमी अंतरामागे एका पैशाची भाडेवाढ

वातानुकुलीत (एसी)वर्गांसाठी (मेल/एक्स्प्रेस रेल्वे गाड्या): 

एसी चेयर कार, एसी 3-टायर/3-इकॉनॉमी आणि एसी पहिला/एक्झीक्युटीव्ह वर्ग/एक्झीक्युटीव्ह अनुभूती: प्रत्येक किमी अंतरामागे दोन पैशांची भाडेवाढ

भाडेशुल्कात करण्यात आलेले हे बदल राजधानी, शताब्दी, दुरांतो,वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, युवा एक्स्प्रेस, एसी व्हिस्टाडोम, अनुभूती कोचेस तसेच सामान्य बिगर-उपनगरी सेवा अशा प्रमुख आणि विशेष रेल्वे सेवांसाठी देखील सुधारित वर्ग-निहाय शुल्करचनेनुसार लागू होणार आहेत.

पूरक शुल्कांमध्ये कोणताही बदल नाही:

  • आरक्षण शुल्क, अतिवेगवान गाड्यांसाठी द्यावे लागणारे अधिभार तसेच इतर सर्व प्रकारच्या शुल्कांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • लागू असलेल्या नियमांनुसार जीएसटी आकारण्यात येईल.
  • शुल्क गोळाबेरीजविषयक तत्वे विद्यमान नियमांनुसार लागू होतील.

अंमलबजावणी

सुधारित शुल्क 01 जुलै 2025 रोजी अथवा त्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू आहे. या तारखेपूर्वी जारी केलेली तिकिटे कोणत्याही शुल्क समायोजनाशिवाय, विद्यमान शुल्कासह वैध असतील. पीआरएस, युटीएस आणि प्रत्यक्ष तिकीट खरेदी प्रणाली नव्या सुधारणेनुसार अद्ययावत करण्यात येत आहेत.
सुधारित शुल्क रचनेच्या सुरळीत अंमलबजावणीच्या सुनिश्चितीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागीय रेल्वे परिमंडळांसाठी आवश्यक सूचना जारी केल्या असून विभागीय रेल्वे परिमंडळांना अद्ययावत शुल्काची माहिती सर्व स्थानकांवर प्रदर्शित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

सुधारित प्रवासी शुल्क तक्ता पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140983)