पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जी 7 शिखर परिषदेत पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद

Posted On: 18 JUN 2025 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे 51 व्या जी 7 शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधला. विविध मुद्द्यांबाबत विचारांचे आदानप्रदान करत, उभय नेत्यांनी  भारत आणि फ्रान्स आपल्या वसुंधरेच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील यावर भर दिला.

एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधणे आणि विविध मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान  करणे नेहमीच आनंददायी असते. भारत आणि फ्रान्स आपल्या ग्रहाच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत राहतील.

@EmmanuelMacron"

S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2137280)