नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

काही निवडक विमानतळे आणि हवाई मार्गांवरून नागरी विमान वाहतूक सेवेला तात्पुरती स्थगिती

Posted On: 10 MAY 2025 10:45AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2025

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airport Authority of India - AAI) आणि संबंधित हवाई वाहतूक प्राधिकरणांनी वैमानिकांसाठी सूचना (Notices to Airmen - NOTAMs) जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील 32 विमानतळांवरील सर्व नागरी विमान उड्डाणे 9 मे ते 14 मे 2025 पर्यंत (भारतीय प्रमाण वेळेनुसार 15 मे 2025 रोजी 05:29 वा.) कार्यान्वयन कारणांमुळे तात्पुरती बंद ठेवली जाणार आहेत. या सूचनेमुळे (NOTAM) खाली नमूद विमानतळांवरील सेवा प्रभावित होईल:

  1. अधमपूर
  2. अंबाला
  3. अमृतसर
  4. अवंतीपूर
  5. बठिंडा
  6. भुज
  7. बिकानेर
  8. चंदीगड
  9. हलवारा
  10. हिंडन
  11. जैसलमेर
  12. जम्मू
  13. जामनगर
  14. जोधपूर
  15. कांडला
  16. कांग्रा (गग्गल)
  17. केशोद
  18. किशनगड
  19. कुल्लू मनाली (भुंतर)
  20. लेह
  21. लुधियाना
  22. मुंद्रा
  23. नलिया
  24. पठाणकोट
  25. पटियाला
  26. पोरबंदर
  27. राजकोट (हिरासर)
  28. सरसावा
  29. शिमला
  30. श्रीनगर
  31. थॉईस
  32. उत्तरलाई

या विमानतळांवरील सर्व नागरी विमान वाहतूक सेवा वर नमूद कालावधीत स्थगित राहतील.

याशिवाय भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे (AAI) दिल्ली आणि मुंबई हवाई वाहतूक माहिती क्षेत्रातील (Flight Information Regions - FIRs) हवाई वाहतूक सेवा (Air Traffic Service - ATS) मार्गांर्गतचे 25 विभाग देखील कार्यात्मक कारणांमुळे तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत.

NOTAM G0555/25 नुसार (G0525/25 ऐवजी लागू असलेली), 14 मे 2025 रोजी समन्वित सार्वत्रिक वेळेनुसार (UTC) 23:59 वाजेपर्यंत (भारतीय प्रमाण वेळेनुसार 15 मे 2025 रोजी 05:29 वाजेपर्यंत) हे 25 मार्ग भूपृष्ठीय पातळीपासून अमर्याद उंचीपर्यंत अनुपलब्ध असणार आहेत.

विमान कंपन्या आणि विमान चालकांनी सध्याच्या हवाई वाहतूक विषयक मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यायी मार्गांचे नियोजन करावे असा सल्लाही दिला गेला आहे. सुरक्षेची खात्री करण्यासह संभाव्य अडथळे कमी करण्यासाठी या तात्पुरत्या बंदीचे व्यवस्थापन संबंधित हवाई वाहतूक नियंत्रण (Air Traffic Control - ATC) विभागाच्या समन्वयाने केले जात आहे.

 

* * *

NM/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2128032)