WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन वेव्हज 2025 मध्ये भारताची ‘लाइव्ह इव्हेंट्स’ अर्थव्यवस्था : एक अत्यावश्यक धोरणात्मक वाढ यावर श्वेतपत्रिका जारी करणार


2030 पर्यंत भारत जगातील पाच अव्वल मनोरंजन ठिकाणांमध्ये स्थान मिळवण्यास सज्ज

लाइव्ह इव्हेंट्स हे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असेल

 Posted On: 01 MAY 2025 1:27PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 1 मे 2025

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन हे "भारताची लाइव्ह इव्हेंट्स अर्थव्यवस्था: एक अत्यावश्यक धोरणात्मक वाढ" यावरील श्वेतपत्रिकेचे अनावरण करतील.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सुरू केलेली ही पहिलीच श्वेतपत्रिका आहे.

3, मे 2025 रोजी मुंबईत वेव्हज शिखर परिषद 2025 दरम्यान औपचारिकपणे श्वेतपत्रिकेचे अनावरण होईल. श्वेतपत्रिकेत भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या लाईव्ह मनोरंजन उद्योगाचे व्यापक विश्लेषण सादर केले आहे, जे उदयोन्मुख ट्रेंड, वाढीचे मार्ग आणि या क्षेत्राच्या निरंतर  उत्क्रांतीसाठी धोरणात्मक शिफारसी अधोरेखित केल्या आहेत.

भारताच्या लाइव्ह इव्हेंट्स अर्थात थेट, प्रत्यक्ष कार्यक्रम  परिसंस्थेत - एक विखंडित क्षेत्र ते देशाच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचा रचनात्मक आणि प्रभावशाली स्तंभ असे परिवर्तन होत आहे. 2024 ते 2025 हा कालावधी एक निर्णायक वळण आहे, ज्यामध्ये 'कोल्डप्ले' सारखे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अहमदाबाद आणि मुंबईत सादर होत आहेत आणि यातून जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्याची भारताची तयारी दिसून येते.

या क्षेत्रातील प्रमुख बदल म्हणजे इव्हेंट टुरिझमचा उदय , ज्यामध्ये जवळपास पाच लाख प्रेक्षक खास संगीताच्या लाइव्ह  कार्यक्रमासाठी  प्रवास करतात आणि यातून एका मजबूत संगीत-पर्यटन अर्थव्यवस्थेच्या उदयाचे संकेत मिळत आहेत.  व्हीआयपी एक्सपीरिअन्स , क्युरेटेड अॅक्सेस आणि लक्झरी हॉस्पिटॅलिटी असे प्रीमियम तिकीट विभाग आहेत ज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 100% अधिक वाढ झाली आहे जे खास अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सूचित करतात. विविध शहरांच्या टूर्स आणि प्रादेशिक उत्सवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे  द्वितीय श्रेणीतील शहरांमधील सहभाग वाढला आहे .

2024 मध्ये, लाईव्ह इव्हेंट विभागाने 15% वाढ नोंदवली, ज्यामुळे अतिरिक्त 13  अब्ज रुपयांचा महसूल मिळाला. परिणामी भारतातील माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेपैकी एक बनला. सध्याच्या परिसंस्थेत भव्य कार्यक्रमांच्या आयोजनामुळे साधारणपणे प्रत्येकी 2,000 ते  5,000  तात्पुरते रोजगार निर्माण होतात, ज्यामुळे रोजगार आणि कौशल्य विकासात या क्षेत्राचे वाढते योगदान अधोरेखित होते.

केंद्रित गुंतवणूक, धोरणात्मक पाठबळ  आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह, 2030 पर्यंत भारत जागतिक स्तरावरील अव्वल पाच लाईव्ह मनोरंजन स्थळांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे आर्थिक विकास , रोजगार निर्मिती, पर्यटन आणि वाढत्या जागतिक सांस्कृतिक अस्तित्वासाठी  नवीन संधी खुल्या होतील.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S. Kane/CY


Release ID: (Release ID: 2125745)   |   Visitor Counter: 44