माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत वेव्हज शिखर परिषदेविषयी आढावा बैठक संपन्न, राज्यमंत्र्यांनी आयोजन स्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष तयारीचा घेतला आढावा
Posted On:
18 APR 2025 5:06PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 18 एप्रिल 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आज जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual and Entertainment Summit - WAVES) 2025 संदर्भात मुंबईत आढावा बैठक घेतली. मुंबईत जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे ही बैठक पार पडली. या परिषदेसाठीचे केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे समन्वय अर्थात नोडल अधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. प्रसारण आणि माहितीपर मनोरंजन, AVGC-XR (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स - एक्सटेंडेड रिअॅलिटी अर्थात वर्धित वास्तव ), डिजिटल माध्यमे आणि नवोन्मेष तसेच चित्रपट या वेव्हज शिखर परिषदेच्या चार प्रमुख स्तंभ असलेल्या घटकांअंतर्गच्या उपक्रमांशी संबंधित प्रगतीचा आढावा या बैठकीत राज्यमंत्र्यांनी घेतला. वेव्हज बाजार, वेव्हेक्स (WAVEX), भारत पॅव्हिलियन, क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस आणि इतर विविध उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांचाही सविस्तर आढावा यावेळी घेतला गेला, तसेच पुढची दिशा ठरवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. विविध विभागांसाठी नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी अर्थात नोडल अधिकाऱ्यांनी तयारीच्या प्रगतीबाबत राज्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी एल. मुरुगन यांनी या शिखर परिषदेच्या आयोजन स्थळाला भेट देऊन तिथे प्रत्यक्षात सुरू असलेल्या तयारीचाही आढावा घेतला.



वेव्हज शिखर परिषद 2025 विषयी
महाराष्ट्रात मुंबई इथे येत्या 1 मे ते 4 मे 2025 या कालावधीत आयोजित केली गेलेली पहिली वहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) हे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारे आयोजन आहे. ही शिखर परिषद भारत सरकारच्या वतीने आयोजित केली जात आहे.
माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक, गुंतवणूकदार, सर्जनशील कलाकार, अथवा नवोन्मेषक अशा प्रत्येकासाठी या शिखर परिषदेच्या माध्यमातून परस्परांसोबत जोडून घेण्यासाठी, सहकार्यपूर्ण भागिदाऱ्या प्रस्थापित करण्यासाठी, नवोन्मेषी कल्पना साकारण्यासाठी तसेच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे योगदान देण्यासाठीचे सर्वोच्च जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
वेव्हज शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सर्जनशील क्षमतेचे व्यापक दर्शन जगाला घडणार आहे, तसेच आशय सामग्री निर्मिती, बौद्धिक मालमत्ता आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक भक्कम होणार आहे. या परिषदेअंतर्गत प्रसारण, मुद्रित माध्यमे, दूरचित्रवाणी, नभोवाणी, चित्रपट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम व्यासपीठे, जनरेटिव्ह एआय, वर्धित वास्तव अर्थात ऑगमेंटेड रिअॅलिटी (Augmented Reality - AR), आभासी वास्तव अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटी (Virtual Reality - VR) आणि विस्तारीत वास्तव अर्थात एक्सटेंडेड रिअॅलिटी (Extended Reality - XR) अशा विविध उद्योग आणि क्षेत्रांवर भर दिला गेला आहे.
या परिषदेविषयी आपल्या मनात काही प्रश्न आहेत? उत्तरांसाठी इथे क्लिक करा
ताज्या घोषणांसाठी पीआयबी टीम वेव्हजच्या संपर्कात रहा
वेव्हज शिखर परिषदेसाठी आत्ताच नोंदणी करा.
* * *
PIB Mumbai | S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2122695)
| Visitor Counter:
38
Read this release in:
Odia
,
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam