पंतप्रधान कार्यालय
युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राच्या समावेशाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
18 APR 2025 12:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे म्हणजे आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जगन्मान्यता आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समावेशाची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या एक्सवरील एका पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिलेः
“जगातील प्रत्येक भारतीयासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे”!
युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे म्हणजे आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जगन्मान्यता आहे.
गीता आणि नाट्यशास्त्राने अनेक शतकांपासून संस्कृती आणि चेतना यांची जोपासना केली आहे. त्यांची अंतर्दृष्टी जगाला कायम प्रेरणा देत राहील.
@UNESCO”
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122621)
आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada