पंतप्रधान कार्यालय
कुमुदिनी लखिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
12 APR 2025 3:39PM by PIB Mumbai
कुमुदिनी लखिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. सांस्कृतिक क्षेत्रातील श्रेष्ठ प्रतिमा म्हणून अभिवादन करत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. कथ्थक आणि भारतीय शास्त्रीय नृत्याविषयी त्यांचे उत्कट प्रेम त्यांच्या उल्लेखनीय कार्यातून दिसून येते.
आपल्या X पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे,
एक निपुण सांस्कृतिक प्रतीक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या कुमुदिनी लखिया’जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. कथ्थक आणि भारतीय शास्त्रीय नृत्यांविषयी त्यांची निष्ठा गेल्या काही वर्षांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्यातून दिसून आली आहे. एक निपुण कलावंत असणाऱ्या कुमुदिनी यांनी नर्तकांच्या पिढ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. त्याचे कुटुंबीय, शिष्य आणि प्रशंसक यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांति!!
***
M.Pange/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2121232)
आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam