माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतातील व्हीएफक्स कलाकारांच्या भावी पिढीची जडणघडण करणार्या डब्लूएएफएक्स WAFX परिसंवाद मालिकेचा प्रारंभ
डब्लूएएफएक्स WAFX 2025 मध्ये भारतातील व्हीएफएक्स तंत्रज्ञानातील अव्वल प्रतिभावंतांमध्ये चुरस, चार शहरांमध्ये होणार विभागीय अंतिम फेरी तर वेव्हज मुंबई येथे होणार भव्य अंतिम स्पर्धा
Posted On:
27 MAR 2025 3:42PM by PIB Mumbai
मुंबई, 26 मार्च 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अॅपटेक लिमिटेड आणि एबीएआय यांच्या सहकार्याने, वेव्हज वीएफक्स या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी सहभागींना तयार करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डब्लूएएफएक्स WAFX 2025 चर्चासत्राची मालिका सुरु केली आहे. ही मालिका म्हणजे भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह पुढील पिढीतील व्हीएफएक्स प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या क्रिएट इन इंडिया सीझन एक अंतर्गत असलेला उपक्रम आहे.
उद्योग जगतातील आघाडीचे व्यावसायिक डब्लूएएफएक्स WAFX 2025 चर्चासत्राच्या मालिकेत उदयोन्मुख व्हीएफएक्स कलाकारांना शिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. उद्योगजगतातील सध्याचे कल जाणून घेण्यासाठी अंतर्दृष्टी प्रदान करणे, प्रगत व्हीएफएक्स तंत्र, करिअरच्या दृष्टीने उत्तम संधी याविषयी मार्गदर्शन, सहभागींना स्पर्धेसाठी तयार करत असतानाच त्यांना व्हीएफएक्स उद्योगातील विकसित परिदृश्याचे आकलन करून देणे हे या चर्चासत्रांचे उद्दिष्ट आहे.

अॅपटेक मुंबई येथे झालेल्या पहिल्या चर्चासत्रात पोचर, लिओ आणि भेडिया या कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेले प्रख्यात व्हीएफएक्स सुपरवायझर जतीन ठक्कर उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात, एमएएसीने स्कॅनलाइन व्हीएफएक्स मधील व्हीएफएक्स सुपरवायझर जय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली एक वेबिनार आयोजित केला होता, या वेबिनारचे संपूर्ण भारतात लाईव्ह-स्ट्रीमिंग करण्यात आले. मेहता यांनी उपस्थिताना व्हीएफएक्सच्या जगाची एक खास सफर घडवून आणली .
वेव्हज 2025 चा एक भाग असलेल्या डब्लूएएफएक्सच्या विभागीय अंतिम स्पर्धा चंदीगड, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता या महानगरांमध्ये एप्रिल 2025 च्या मध्यात होतील. या स्पर्धांमधील अव्वल प्रतिस्पर्धी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणाऱ्या वेव्हज 2025 च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
डब्लूएएफएक्स विभागीय अंतिम स्पर्धा हे एक असे व्यासपीठ असेल जिथे संपूर्ण भारतातील ऑनलाइन व्हीएफएक्स स्पर्धेतील सहभागी प्रतिष्ठित ज्युरींसमोर थेट सादरीकरण करतील. विजेत्यांना उद्योगसमूहात ओळख मिळण्यासह पारितोषिके आणि आघाडीच्या व्हीएफएक्स कंपन्यांमध्ये स्टुडिओ इंटर्नशिप मिळेल, ज्यामुळे अर्थातच त्यांच्या करिअरच्या संधी द्विगुणित होतील.
डब्लूएएफएक्स विषयी तसेच आगामी चर्चासत्र आणि विभागीय स्पर्धांविषयी अधिक माहिती करता येथे भेट द्या : https://wafx.abai.avgc.in/
अधिक माहितीसाठी किंवा मीडिया संबंधीत प्रश्नांसाठी संपर्क साधा:
अॅपटेक लिमिटेड; श्रीनिधी अय्यर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स); ईमेल: srinidhi.iyer@aptech.ac.in
* * *
PIB Mumbai | JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115742)
Visitor Counter : 54
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam