शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा 2025' च्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांशी साधला संवाद


'परीक्षा पे चर्चा 2025' च्या दुसऱ्या भागात दीपिका पदुकोण यांचा सहभाग

Posted On: 12 FEB 2025 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी, 'परीक्षा पे चर्चा'च्या 8 व्या सत्राच्या पहिल्या भागात नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या अनौपचारिक पण अत्यंत ज्ञानवर्धक सत्रात, पंतप्रधानांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी  विविध विषयांवर चर्चा केली. उपस्थित 36 विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांकडून पोषण आणि निरामयता, तणाव व्यवस्थापन, स्वतःच्या क्षमता जोखणे, नेतृत्वकला,  पुस्तकांच्या पलीकडे - 360º म्हणजे सर्वांगीण विकास,  सकारात्मक वृत्ती आणि इतर बऱ्याच बाबींवर जाणून घेतले. या संवादात्मक सत्रातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि प्रगतीच्या मानसिकतेसोबत शैक्षणिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वेगळा दृष्टिकोन आणि व्यवहार्य,तर्कसंगत समज लाभली.

'परीक्षा पे चर्चा'च्या  8 व्या सत्राच्या  दुसऱ्या भागात आज प्रसिद्ध अभिनेत्री आणि मानसिक आरोग्य जागृती प्रसारक  दीपिका पदुकोण यांनी भाग घेतला. सुमारे 60 विद्यार्थ्यांनी या संवादात्मक सत्रात भाग घेतला.

मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर मात करणे, व्यक्तीला कसे सक्षम बनवू शकते, हे दीपिका यांनी विशद केले. आपल्या स्वतःच्या संघर्षामधून मिळालेली मोलाची शिकवण त्यांनी सामायिक केली. तणाव व्यवस्थापनाविषयीच्या आपल्या उपायांविषयी सांगताना त्यांनी पुरेशी झोप घेणे, नैसर्गिक सूर्यप्रकाश,  ताज्या  हवेत बाहेर मोकळा वेळ घालवणे आणि तणाव प्रभावीपणे कमी करण्यासाठी निरोगी दिनचर्या राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.  अपयशाकडे शिकण्याची  संधी म्हणून पाहावे आणि दृढनिश्चयाने पुढे जावे, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

"व्यक्त व्हा, घुसमटू नका" - या पंतप्रधानांच्या संदेशाचा पुनरुच्चार करताना दीपिका यांनी  गरज पडल्यास मदत घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

परीक्षा पे चर्चाच्या 8 व्या सत्राने नवा विक्रम स्थापित केला आहे. 5 कोटींहून अधिक सहभागासह यंदा हा कार्यक्रम जन आंदोलन बनला असून शिकण्याच्या सामूहिक उत्सवासाठी तो प्रेरणा देतो.

पहिला भाग पाहण्यासाठी लिंक :  https://www.youtube.com/watch?v=G5UhdwmEEls

दुसरा भाग पाहण्यासाठी लिंक :  https://www.youtube.com/watch?v=DrW4c_ttmew


S.Tupe/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2102708) Visitor Counter : 18