गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थांच्या विरोधात शुन्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब करत 2024 या वर्षात 25,000 कोटी रुपयांहून अधिक किमतेचे अंमली पदार्थ जप्त
2023 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 16,100 कोटी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांच्या तुलनेत 2024 मध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 55 टक्क्यांनी जास्त
हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारलेल्या 'बॉटम टू टॉप' आणि 'टॉप टू बॉटम' दृष्टिकोनाचे प्रतीक
Posted On:
10 FEB 2025 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 2024 या वर्षात अंमली पदार्थांच्या विरोधात शुन्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब करत, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) सह देशभरातील सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांनी सुमारे 25,330 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. 2023 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 16,100 कोटी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांच्या तुलनेत 2024 मध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे मूल्य 55 टक्क्यांनी जास्त आहे. हे यश म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात स्वीकारण्यात आलेल्या 'बॉटम टू टॉप' आणि 'टॉप टू बॉटम' दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. मोदी सरकार अंमली पदार्थमुक्त भारत निर्माण करण्यासाठी संपूर्ण समावेशक दृष्टिकोनासह पुढे जात आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) ने विविध एजन्सींच्या सहकार्याने 2024 मध्ये केलेल्या मोठ्या कारवाई :
- फेब्रुवारी 2024: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन जणांना अटक केली आणि 50 किलो अंमली पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक रसायन #’स्यूडोएफेड्रिन’ जप्त करून अंमली पदार्थ तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला.
- फेब्रुवारी 2024: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो, नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या 'सागर मंथन-1' या सांकेतिक नावाच्या संयुक्त कारवाईत, हिंदी महासागरात अंदाजे 3300 किलो अंमली पदार्थ (3110 किलो चरस किंवा हशिश, 158.3 किलो क्रिस्टलाईन पावडर मेथ आणि 24.6 किलो संदिग्ध हेरॉइन) जप्त करण्यात आले.
- मार्च 2024: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने फेब्रुवारी 2024 मध्ये अंमली पदार्थ तस्करी टोळीचा प्रमुख जाफर सादिक याला अटक केली.
- एप्रिल 2024: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने, गुजरात पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाच्या सोबतीने केलेल्या संयुक्त सागरी कारवाईत, सुमारे 86 किलो हेरॉइन वाहून नेणारी परदेशी बोट जप्त करण्यात आली तसेच 14 पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे 602 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
- ऑक्टोबर 2024: अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील कासना औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात शोध मोहीम राबवली आणि त्यात घन आणि द्रव स्वरूपातील सुमारे 95 किलो मेथाम्फेटामाइन जप्त केले.
- नोव्हेंबर 2024: भारतात आणि विशेषतः दिल्ली एनसीआर भागात कार्यरत असलेल्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळी विरुद्ध केलेल्या कारवाईला यश मिळाले. या कारभारीत अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने दिल्ली येथे कोकेनचा सर्वात मोठा साठा जप्त केला.
- नोव्हेंबर 2024: 'सागर मंथन-4' या संयुक्त मोहिमेत, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो, भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आणि गुजरातमध्ये प्रतिबंधित 700 किलो मेथ जप्त केले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2101568)
Visitor Counter : 34
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam