पंतप्रधान कार्यालय
बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2025 9:00AM by PIB Mumbai
महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे :
“पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल बर्ट डी वेव्हर यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-बेल्जियम संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक बाबींवर दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास मी उत्सुक आहे. तुमच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा.”
***
JPS/Bhakti/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2099430)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada