गृह मंत्रालय
भारत सरकार अत्यंत दुःखाने जाहीर करत आहे की भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे.
या दिवंगत व्यक्तीमत्वाला आदरांजली म्हणून संपूर्ण भारतात 26 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार आहे.
दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
Posted On:
27 DEC 2024 3:05AM by PIB Mumbai
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 26.12.2024 रोजी एम्स रुग्णालय, नवी दिल्ली येथे निधन झाल्याची घोषणा भारत सरकारने केली आहे.
दिवंगत माननीय पंतप्रधानांच्या स्मरणार्थ, 26.12.2024 ते 01.01.2025 या दोन्ही दिवसांसह संपूर्ण भारतभर सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, जेथे तो नियमितपणे उंच फडकवला जातो तसेच देशभरात या दुखवटा कालावधीत कोणतेही अधिकृत मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत. दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
परदेशातील सर्व भारतीय मिशन्स तसेच भारतीय उच्चायुक्तालयांमध्ये अंत्यसंस्काराच्या दिवशीही राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2088329)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam