पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांची घेतली भेट
बैठकीची संकल्पना : जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या विकासाचा वेग कायम राखणे
मानसिकतेत मूलभूत बदल करत 2047 पर्यंत विकसित भारत उद्दिष्ट साध्य करता येईल : पंतप्रधान
रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, कृषी उत्पादकता वाढवणे, गुंतवणूक आकर्षित करणे, निर्यातीला चालना देणे यासह विविध विषयांवर अर्थतज्ञांनी सूचना केल्या सामायिक
Posted On:
24 DEC 2024 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नीति आयोग कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 च्या तयारी संदर्भात प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत नेत्यांच्या गटाशी संवाद साधला.
ही बैठक "जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या विकासाचा वेग कायम राखणे" या संकल्पनेवर आधारित होती.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात या वक्त्यांचे त्यांच्या अभ्यासपूर्ण विचारांबद्दल आभार मानले. मानसिकतेत मूलभूत बदल करत, 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मानसिकतेतून विकसित भारत उद्दिष्ट साध्य करता येईल यावर पंतप्रधानांनी भर दिला.
सहभागींनी पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले - जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना दिशादर्शन करणे, विशेषत: तरुणांमध्ये रोजगार वाढवणे आणि विविध क्षेत्रांमध्ये शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे, रोजगाराच्या बाजारपेठेच्या विकसित गरजांनुसार शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम संरेखित करण्याचे धोरण, कृषी उत्पादकता वाढवणे तसेच शाश्वत ग्रामीण रोजगाराच्या संधी निर्माण करणे, खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सार्वजनिक निधी एकत्रित करणे.
डॉ.सुरजित एस भल्ला, डॉ. अशोक गुलाटी, डॉ. सुदिप्तो मुंडले, धर्मकीर्ती जोशी, जनमेजय सिन्हा, मदन सबनवीस, प्रा. अमिता बत्रा, रिधम देसाई, प्रा. चेतन घाटे, प्रा.भरत रामास्वामी, डॉ.सौम्या कांती घोष, सिद्धार्थ सन्याल, डॉ लवीश भंडारी, रजनी सिन्हा, प्रा केशब दास, डॉ प्रीतम बॅनर्जी, राहुल बाजोरिया, निखिल गुप्ता आणि प्रा. शाश्वत आलोक यांच्यासह अनेक नामवंत अर्थतज्ञ आणि विश्लेषक यात सहभागी झाले होते.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2087734)
Visitor Counter : 23