पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 04 DEC 2024 10:06AM by PIB Mumbai

भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त शुभेच्छा देताना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षा व प्रगती प्रती  त्यांच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली. 

मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावरील  पोस्टमध्ये लिहिले, 

“देशाच्या सागरी सीमांचे अतुल्य धाडसाने  व समर्पणभावाने रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त आम्ही प्रणाम करतो . त्यांच्या या वचनबद्धतेमुळे आपल्या  देशाची सुरक्षा व प्रगती  सुनिश्चित होते. भारताच्या समृद्ध नौदल इतिहासाचादेखील  आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”

***

SonalT/UmaR/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2080493) Visitor Counter : 24