पंतप्रधान कार्यालय
थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांनी दिवाळी उत्सवाचे उद्घाटन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2024 10:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2024
थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांनी आज, बँकॉकमध्ये लिटील इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहुरत येथे अमेझींग थायलंड दिवाळी उत्सव 2024 चे उद्घाटन केले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उत्सवासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
"पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांच्या सौहार्दामुळे आनंद झाला. अमेझींग थायलंड दिवाळी उत्सवाला माझ्या शुभेच्छा. भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध अधिक दृढ होवोत."
@ingshin
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2069754)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam