पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध नर्तक आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक कनक राजू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
Posted On:
26 OCT 2024 10:36AM by PIB Mumbai
देशातील उत्कृष्ट नर्तक आणि भारताचे सांस्कृतिक प्रतिक असलेले कनक राजू जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. गुस्साडी नृत्याचे जतन करण्यासाठी आणि या नृत्याच्या सांस्कृतिक वारशाच्या महत्त्वपूर्ण पैलूंचे त्यांच्या अस्सल स्वरूपात जतन संवर्धन करण्यात कनक राजू यांनी दिलेले समर्पक योगदान आणि उत्कटतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात लिहिले:
“भारतातील प्रसिद्ध नर्तक आणि भारताचे सांस्कृतिक प्रतीक श्री कनक राजू जी, यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले. गुस्साडी नृत्य जपण्यासाठी त्यांनी दिलेले भरीव योगदान आगामी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या समर्पण आणि उत्कटतेमुळे सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे पैलू त्यांच्या अस्सल स्वरूपात भरभराटीस येतील. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती.”
***
S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068380)
अभ्यागत कक्ष : 119
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam