पंतप्रधान कार्यालय
16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या द्विपक्षीय भेटीदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
Posted On:
23 OCT 2024 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2024
महामहिम,
आपल्याला भेटून मला आनंद वाटत आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे आपली ही 5 वर्षांनंतरची औपचारिक भेट आहे.
आम्ही मानतो, की भारत-चीन संबंधांचे महत्त्व केवळ आपल्या लोकांसाठी नाही.
जागतिक शांतता, स्थैर्य आणि प्रगतीसाठीही आपले संबंध महत्त्वाचे आहेत.
महामहिम,
परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्परसंवेदनशीलता हा आपल्यातील संबंधांचा आधार असायला हवा.
आज आपल्याला या सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.
मला विश्वास आहे, की आपण खुल्या विचारांनी परस्परांशी संवाद साधू आणि आपल्यातील चर्चा फलदायी ठरेल.
धन्यवाद!
टीप: पंतप्रधानांच्या हिंदी भाषेतील निवेदनाचा हा अनुवाद आहे.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067514)
Visitor Counter : 50
Read this release in:
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi