पंतप्रधान कार्यालय
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
Posted On:
03 OCT 2024 10:05PM by PIB Mumbai
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आसामी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. आसामी संस्कृतीची गेल्या अनेक शतकांपासून भरभराट होत आहे आणि तिने आपल्याला एक समृद्ध साहित्यिक परंपरा दिली आहे. आगामी काळात ही भाषा अधिकाधिक लोकप्रिय होत राहो. माझ्याकडून अभिनंदन.”
“मला खूप आनंद आहे की महान बंगाली भाषेला विशेषत: दुर्गापूजेच्या शुभ मुहूर्तावर अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे . बंगाली साहित्याने वर्षानुवर्षे असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. यानिमित्ताने मी जगभरातील सर्व बंगाली भाषिकांचे अभिनंदन करतो.”
"मराठी भाषा हा भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे आपल्या राष्ट्राच्या इतिहासात मराठीने दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव आहे. मराठी भाषा नेहमीच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे.
मला विश्वास आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे असंख्य लोकांना ती भाषा शिकण्यास प्रेरणा मिळेल. ”
“पाली आणि प्राकृत भाषांचे मूळ भारताच्या संस्कृतीत आहे. या अध्यात्म, ज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या भाषा आहेत. त्यांच्या साहित्यिक परंपरेसाठीही त्या ओळखल्या जातात. अभिजात भाषा म्हणून त्यांची मान्यता भारतीय विचार, संस्कृती आणि इतिहासावरील त्यांच्या शाश्वत प्रभावाचा सन्मान आहे.
मला विश्वास आहे की त्यांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, अधिकाधिक लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेरणा मिळेल. हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे!”
“কেন্দ্ৰীয় মন্ত্ৰীসভাৰ অনুমোদন পোৱাৰ পিছত অসমীয়াই এতিয়া ধ্ৰুপদী ভাষাৰ মৰ্যাদা লাভ কৰাত মই অতিশয় আনন্দিত হৈছোঁ। অসমীয়া সংস্কৃতিয়ে যুগ যুগ ধৰি উজ্বলি উঠিছে আৰু আমাক এক চহকী সাহিত্যিক পৰম্পৰা প্ৰদান কৰিছে। আগন্তুক সময়ত এই ভাষা আৰু অধিক জনপ্ৰিয় হৈ পৰক। সকলোকে মই অভিনন্দন জনালোঁ।”
“আমি অত্যন্ত খুশি যে মহান বাংলা ভাষাকে ধ্রুপদী ভাষার মর্যাদা দেওয়া হয়েছে আর তাও পবিত্র দুর্গা পূজার সময়েই।বাংলা সাহিত্য অসংখ্য মানুষকে বছরের পর বছর ধরে অনুপ্রাণিত করে আসছে । এই উপলক্ষে বিশ্ব জুড়ে সকল বাংলা ভাষাভাষী-কে অভিনন্দন জানাই ।”
“मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.”
***
SonalT/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2061850)
Visitor Counter : 65
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam