अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार एनपीएस वात्सल्य योजनेचा होणार प्रारंभ


नवी दिल्लीतील मुख्य उद्‌घाटन सोहोळ्याशी सुमारे 75 स्थाने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडली जाणार

एनपीएस वात्सल्यदारे बालपणापासूनच मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची भारत सरकारची बांधिलकी होते अधोरेखित

Posted On: 16 SEP 2024 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मधील घोषणेच्या अनुषंगाने, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 18 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे एनपीएस वात्सल्य योजना सुरू करणार आहेत. शाळकरी मुलेही या उद्‌घाटन कार्यक्रमात सहभागी होतील.

केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या हस्ते एनपीएस वात्सल्य योजना सदस्यतेसाठी, ऑनलाइन प्लॅटफॉर्म चे देखील अनावरण होईल त्याचबरोबर  योजनेचे माहितीपत्रक जारी करण्याबरोबरच नवीन अल्पवयीन ग्राहकांना कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक (पीआरएएन) कार्डही  वितरित करतील.

एनपीएस वात्सल्य च्या नवी दिल्ली येथील उद्‌घाटन सोहोळ्याअंतर्गत देशभरात जवळपास 75 ठिकाणी एकाच वेळी असा कार्यक्रम आयोजित केला जाईल. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही ठिकाणे सहभागी होतील आणि त्या ठिकाणी नवीन अल्पवयीन सदस्यांची पीआरएएन कार्ड देऊन नोंदणी केली जाईल.

एनपीएस वात्सल्य योजनेच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी निवृत्तीवेतन खात्यात गुंतवणूक करून बचत करता येईल आणि दीर्घकालीन मिळकतीची खातरजमा होईल.एनपीएस वात्सल्य लवचिक योगदान आणि गुंतवणुकीचे पर्याय देते ज्याद्वारे पालकांना मुलाच्या नावावर वार्षिक 1,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. अशा प्रकारे ही योजना सर्व आर्थिक स्तरातील कुटुंबांना सुलभ होते.

भारताच्या निवृत्तीवेतन व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून हा नवा उपक्रम मुलांचे आर्थिक भविष्य बालपणापासूनच सुरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.ही योजना निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) अंतर्गत राबवली जाईल.

एनपीएस वात्सल्य ची सुरुवात दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांसाठी सुरक्षितता वाढवण्याच्या भारत सरकारची बांधिलकी अधोरेखित करते.भारताच्या भावी पिढ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित आणि स्वतंत्र बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

 

 N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2055446) Visitor Counter : 117