महिला आणि बालविकास मंत्रालय
7 व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 च्या 6 व्या दिवसापर्यंत 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 752 जिल्ह्यांमध्ये 1.37 कोटी कार्यक्रमांची नोंद.
बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही आतापर्यंत सर्वाधिक योगदान देणारी राज्ये.
शिक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालय ही सर्वोच्च योगदान देणारी मंत्रालये.
Posted On:
07 SEP 2024 10:13AM by PIB Mumbai
गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सुरू करण्यात आलेला 7 वा राष्ट्रीय पोषण माह, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान यासह ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय; ग्रोथ मॉनिटरिंग अर्थात मुलांच्या वाढीचे निरिक्षण, पूरक आहार आणि ‘पोषन भी पढाई भी’ यासारख्या प्रमुख संकल्पनावर लक्ष केंद्रित करत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाद्वारे ही मोहीम पर्यावरणीय शाश्वततेवरही भर देत असून या मोहिमेत सर्व कार्यरत 13.95 लाख अंगणवाडी केंद्रांमध्ये वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जात आहे.
या देशव्यापी उपक्रमाच्या 6 व्या दिवसापर्यंत, 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 752 जिल्ह्यांमध्ये 1.37 कोटी विविध कार्यक्रम संपन्न झाल्याचे नोंदवले गेले आहे. या उपक्रमात आतापर्यंत सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्यांमध्ये बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत.
या उपक्रमातील मुख्य संकल्पना (किंवा मुख्य केंद्रित क्षेत्रावर) आधारित आजवर आयोजित कार्यक्रमांची संख्या पुढील प्रमाणे आहे - ॲनिमिया 39 लाखांहून अधिक उपक्रम, ग्रोथ मॉनिटरिंगवर 27 लाखांहून अधिक उपक्रम, पूरक आहारावर जवळपास 20 लाख उपक्रम, ‘पोशन भी पढाई भी’ वर 18.5 लाखांहून अधिक उपक्रम तर ‘एक पेड माँ के नाम’ च्या माध्यमातून पर्यावरणीय शाश्वततेवर 8 लाख उपक्रम आयोजित केले गेले आहेत. तसेच, प्रमुख केंद्रित क्षेत्रांपैकी एक असलेल्या, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान या क्षेत्राने, महिला आणि बाल विकास विभागाच्या नियुक्त कार्यकर्त्यांना 10 लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, ज्याचा उद्देश आयसीटी ऍप्लिकेशन ‘पोशन ट्रॅकरशी’ जोडलेले पोषण निर्देशक आणि उपक्रमा संबंधी क्षेत्रांची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करण्यात मदत करणे हा आहे.
2018 मध्ये देशातील पहिले पोषण-केंद्रित जनआंदोलन सुरू झाल्यापासून मंत्रालये आणि विभागांसोबत एककेंद्राभिमुखता हा जनआंदोलनाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. एककेंद्राभिमुखतेमुळे विविध लाभार्थ्यांपर्यंत, विशेषतः तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यात मदत मिळते. सध्या सुरू असलेल्या पोषण माहमध्ये आज पर्यंत सर्वाधिक योगदान देणारी मंत्रालये 1.38 लाख उपक्रमांसह शिक्षण मंत्रालय (MoE), 1.17 लाख कार्यक्रमांसह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoH&FW), 1.07 लाख कार्यक्रमांसह ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD), 69 हजार उपक्रमांसह आयुष मंत्रालय आणि 64 लाख उपक्रमांसह पंचायती राज मंत्रालय (MoPR) असून, ही सर्व मंत्रालये पोषण माह 2024 च्या कोणत्या ना कोणत्या संकल्पनेवर आधारित उपक्रमांचे आयोजन करत आहेत.
पोषण माह अंतर्गत येणाऱ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांव्यतिरिक्त, स्थानिक परिस्थितीनुसार सर्वोत्तम अनुकूल ठरणाऱ्या इतर संकल्पनांवर आधारित संवेदनाक्षम उपक्रम राबवण्याची मुभा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या संकल्पना आधारित कार्यक्रमांमध्ये सर्वात जास्त कार्यक्रम पुढील विषयांवर आधारित आहेत - मुलांसाठी ॲनिमिया शिबिर, किशोरवयीन मुलींसाठी (14 -18 वर्षे) ॲनिमिया शिबिर, मुलांच्या वाढ निरीक्षणावर संवेदना सत्र, वाढ मोजमाप पडताळणी, प्रजनन वयातील महिलांसाठी ॲनिमिया शिबिर, वाढ मोजमाप मोहीम (एसएएम/एमएएम स्क्रीनिंग), पूरक आहार (सुरक्षित, पुरेसे आणि योग्य पूरक) यावरील उपक्रम किंवा शिबिर (6 महिन्यांच्या बालकांना सुरक्षित पुरेसे आणि योग्य पूरक अन्न), शहरी भागातील झोपडपट्ट्यांसाठी ॲनिमिया शिबिर आणि जागरूकता उपक्रम, स्थानिक खाद्यपदार्थांद्वारे पूरक अन्न पाककृती बनवण्याबाबत प्रात्यक्षिक सत्र; महिला बचत गट, राष्ट्रीय सेवा योजना किंवा नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून ॲनिमियाशी संबंधित कार्यक्रम, पूरक आहारासंबंधी आहारातील विविधतेबाबत जागरूकता शिबिर; बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण या संबंधित प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये शिक्षा चौपाल, एक पेड मा के नाम उपक्रमात वृक्षारोपण सोबत पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा; मुले आणि पालकांसाठी स्वदेशी खेळण्यांना प्रोत्साहन देणारे खेळावर आधारित शिक्षणपर कार्यक्रम; शहरी भागातील झोपडपट्ट्यांवर आधारित वाढ मापन मोहीम (एस ए एम/ एम ए एम स्क्रीनिंग), अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी टॉयथॉन (TOYathon) ही स्वदेशी खेळणी बनवण्याची कार्यशाळा, खेळण्यांवर आधारित आणि खेळावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी समुदाय केंद्रीत ‘खेलो और पढो’ उपक्रम, गर्भवती महिलांचे वाढणारे वजन मापन मोहीम (गर्भधारणामुळे वजन वाढणे) आणि या माहितीचा पोशन ट्रॅकरमध्ये समावेश करणे, गाव पातळीवर उपलब्ध असलेले वेगवेगळे अन्न प्रकार अधोरेखित करण्यासाठी अंगणवाडी केंद्राच्या स्तरावर अन्न संसाधन मानचित्रण आणि संबंधित तज्ञांसह पर्यावरण संरक्षणावर विविध उपक्रम.
सामुदायिक सहभाग आणि सरकारच्या सहकार्याचा समावेश असलेल्या देशव्यापी एकात्मिक दृष्टीकोन असणाऱ्या, पोषण-केंद्रित जनआंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्यासाठी आणि संवेदनशील बनवण्यासाठी सध्या सुरू असलेला पोषण माह "सुपोषित किशोरी सशक्त नारी" या मुद्यावर चर्चा घडवून आणत आहे.
***
M.Iyengar/S. Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052748)
Visitor Counter : 79
Read this release in:
Odia
,
English
,
Assamese
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Manipuri
,
Bengali-TR