पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग यांच्यासोबत बैठक
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2024 4:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री आणि माजी पंतप्रधान महामहिम ली सिएन लूंग यांची भेट घेतली. यावेळी मंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते.
पंतप्रधानांनी भारत-सिंगापूर धोरणात्मक भागीदारीच्या विकासामध्ये वरिष्ठ मंत्री ली यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि आशा व्यक्त केली की, नवीन भूमिकेत वरिष्ठ मंत्री ली भारतासोबतच्या सिंगापूरच्या संबंधांवर लक्ष ठेवतील आणि मार्गदर्शन देत राहतील.
त्यांच्या पूर्वीच्या भेटींचा उल्लेख करताना,पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्री ली यांनी भारत-सिंगापूर संबंधांचा सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी मान्य केले की,विशेषतः भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीत ठरवलेल्या सहकार्याच्या स्तंभांतर्गत आणखी काम करण्याची मोठी संधी आहे.त्यांनी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी चर्चा केली,तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2052242)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam