महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

ॲनिमिया: राष्ट्रीय पोषण माह 2024चे मुख्य लक्षित क्षेत्र

Posted On: 03 SEP 2024 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2024

 

या वर्षी पोषण माह ज्या संकल्पनांवर आधारित आहे त्यापैकी ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय ही एक प्रमुख संकल्पना आहे. आरोग्य  जन चळवळीअंतर्गत आजवर ॲनिमिया हा नेहमीच महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. ॲनिमिया ही आरोग्याची अशी समस्या आहे  ज्याचा दुष्परिणाम प्रामुख्याने लहान मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती, प्रसूतीनंतरच्या काळातील स्त्रिया आणि पुनरुत्पादक वयातील महिलांवर पहायला मिळतात. पौगंडावस्थेचा काळ हा तरुणांमधील पौष्टिकतेच्या कोणत्याही त्रुटी दूर करण्यासाठी योग्य वेळ आहे, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांवर ॲनिमियाचे आंतरपिढी परिणाम टाळता येतील.

ॲनिमियाच्या संबंधित समस्यांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी, मागील जागरूकता जनचळवळीमध्ये संबंधित मंत्रालये आणि विभागांना सोबत घेऊन महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने ॲनिमियाशी संबंधित कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेतले होते.  सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या मागील पोषण माहमध्ये, 35 कोटींहून अधिक जागरूकता उपक्रम राबविले होते, त्यापैकी सुमारे 4 कोटी उपक्रम ॲनेमिया वर केंद्रित होते.

या योजनेत 69 लाख गरोदर महिला (PW) आणि 43 लाख स्तनदा माता (LM) पर्यंत थेट पोहोचण्याव्यतिरिक्त, सध्या किशोरवयीन मुलींसाठीच्या (SAG) योजनेअंतर्गत आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांतील 22 लाख पेक्षा जास्त किशोरवयीन मुली (14-18 वर्षे) यांचा समावेश आहे. 10 कोटींहून अधिक लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या थेट उपस्थितीसह, भविष्यात दरवर्षी दोनदा अशा प्रकारच्या पोषण-केंद्रित  अभियानाद्वारे देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणारे हे अशा प्रकारची  पहिलीच जनचळवळआहे. कुपोषणमुक्त भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त गती प्रदान करण्याची सर्व क्षमता किशोरवयीन मुलींच्या सहभागामध्ये आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoH&FW) ॲनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्यासाठी मंत्रालयाचे प्रयत्न सुरू असताना या किशोरवयीन मुलींचा सहभाग विशेष महत्वाचा आहे.

याशिवाय, ॲनिमियाच्या व्यवस्थापनासाठी आणि पाच उत्कर्ष जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींची (14-18 वर्षे वयोगटातील) पोषण स्थिती सुधारण्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालय आयुष मंत्रालयाच्या समन्वयाने एक उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात पुराव्यावर आधारित पुनर्नवा मंडुर यांचा समावेश असलेल्या आयुर्वेदिक उपायांचा वापर केला जाणार आहे. 

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051489) Visitor Counter : 61