राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार-2024 प्रदान

Posted On: 22 AUG 2024 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्ट 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 ऑगस्ट 2024) राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार-2024 प्रदान केले.

राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान चमू या चार श्रेणींमध्ये प्रतिष्ठित शास्त्रज्ञांना 33 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा विज्ञानरत्न पुरस्कार भारतातील आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान संशोधनाचे प्रणेते प्राध्यापक गोविंदराजन पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला.  विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विशेष योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना देण्यात येणारे विज्ञान श्री पुरस्कार, 13 शास्त्रज्ञांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये केलेल्या संशोधनासाठी प्रदान करण्यात आले.  ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात असामान्य योगदान दिले आहे अशा शास्त्रज्ञांना दिला जाणारा विज्ञान युवा-एसएसबी पुरस्कार, हिंदी महासागरातील तापमानवाढ आणि त्याचे परिणाम यावरील अभ्यासातून विस्तारलेल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल तसेच स्वदेशी 5G बेस स्टेशनचा विकास आणि संवाद आणि क्वांटम मेकॅनिक्सच्या अचूक चाचण्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल 18 शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय संशोधन योगदान देणाऱ्या 3 किंवा अधिक शास्त्रज्ञांच्या चमूला देण्यात येणारा विज्ञान चमू पुरस्कार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान-3 लँडरच्या यशस्वी लँडिंगसाठी चांद्रयान-3 च्या चमूला देण्यात आला.  

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार-2024 पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2047657) Visitor Counter : 62