पंतप्रधान कार्यालय
ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2024 9:33AM by PIB Mumbai
ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले आहे.
रिझर्व्ह बँकेने एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान मोदी लिहितात:
“या यशस्वी कामगिरीबद्दल, आणि ती देखील दुसऱ्यांदा करुन दाखवल्याबद्दल, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर @DasShaktikanta यांचे अभिनंदन. रिझर्व्ह बँकेतील त्यांचे नेतृत्व तसेच आर्थिक विकास आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे.”
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047186)
आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam