पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हर घर तिरंगा मोहीम तिरंग्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या मनातील आदर दर्शवते: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 14 AUG 2024 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ म्हणजेच ‘ घरोघरी तिरंगा ‘मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, हर घर तिरंगा ही चळवळ आता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहे. ही मोहीम  तिरंग्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या मनातील आदर दर्शवते.

एक समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये, अमृत महोत्सव हँडलने तामिळनाडूमधील रामेश्वरमजवळील मंडपम येथील भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर हर घर तिरंगा चळवळीच्या उत्सवाची झलक शेअर केली आहे.

अमृत महोत्सवाच्या एक्स पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे की,

"#हरघर तिरंगा संपूर्ण भारतभर लोकप्रिय झाला आहे, ही मोहीम 140 कोटी भारतीयांना तिरंग्याबद्दल असलेला आदर दर्शवते."

 


 
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2045480) Visitor Counter : 64