गृह मंत्रालय
भारत-बांगलादेश सीमेवरील सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारने स्थापन केली समिती
Posted On:
09 AUG 2024 3:06PM by PIB Mumbai
भारत-बांगलादेश सीमेवरील सद्यस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारने एक समिती स्थापन केली आहे. बांगलादेशमधील भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही समिती त्यांच्या बांगलादेशमधील समपदस्थांसोबत संवाद आणि संपर्क सुरू ठेवण्याचे काम करेल. इस्टर्न कमांडच्या सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक या समितीचे नेतृत्व करतील आणि त्यामध्ये बीएसएफ फ्रंटीयर मुख्यालय साऊथ बेँगॉलचे महानिरीक्षक, बीएसएफ फ्रंटीयर मुख्यालय त्रिपुराचे महानिरीक्षक. भारतीय भूमी बंदर प्राधिकरणाचे नियोजन आणि विकास सदस्य आणि भारतीय भूमी बंदर प्राधिकरणाचे सचिव हे सदस्य असतील.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2043649)
अभ्यागत कक्ष : 143
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam