पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

समाजमाध्यमांवर आपल्या प्रोफाईल छायाचित्राच्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन

Posted On: 09 AUG 2024 9:01AM by PIB Mumbai

नागरिकांनी समाज माध्यम मंचावर आपल्या प्रोफाईल छायाचित्रामध्ये बदल करून त्या जागी तिरंगा असलेले छायाचित्र लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोदी यांनी त्यांचे प्रोफाईल छायाचित्र बदलून त्या जागी तिरंगा असलेले प्रोफाईल छायाचित्र ठेवले आहे. त्यांनी सर्वांनाच असे करून हर घर तिरंगा चळवळ एक संस्मरणीय लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांनी प्रत्येकाला harghartiranga.com वर तिरंगा ध्वजासोबतचे सेल्फी छायाचित्र सामाईक करण्याचे देखील आवाहन केले आहे.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“ या वर्षाचा स्वातंत्र्यदिन जवळ येत असताना, चला आपण सर्वांनीच पुन्हा एकदा #HarGharTiranga एक संस्मरणीय लोकचळवळ बनवूया. माझे प्रोफाईल छायाचित्र मी बदलत आहे आणि तुम्ही देखील असेच करून आपला तिरंगा साजरा करण्यामध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा असे आवाहन मी तुम्हा सर्वांना करत आहे. आणि हो, तुमची सेल्फी छायाचित्रे harghartiranga.com वर सामाईक करा.”

***

JPS/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2043467) Visitor Counter : 88