पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
08 AUG 2024 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
फ्रान्समधील पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी या संघाच्या कौशल्याची,चिकाटीची आणि सांघिक भावनेची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"पुढच्या अनेक पिढ्यांकडून गौरवला जाईल असा एक पराक्रम!
भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये चमकला,कांस्यपदक जिंकले! ऑलिम्पिक स्पर्धेतील त्यांचे हे सलग दुसरे पदक आहे, ही आणखी विशेष बाब.
हे यश म्हणजे त्यांचे कौशल्य,चिकाटी आणि सांघिक भावनेचा विजय आहे. त्यांनी प्रचंड धैर्य आणि लवचिकता दाखवली.खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन.
प्रत्येक भारतीयाचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि या कामगिरीमुळे हा खेळ आपल्या देशातील तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होईल."
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2043386)
अभ्यागत कक्ष : 112
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam