पंतप्रधान कार्यालय
भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करायला युनायटेड किंगडमचे नवनियुक्त पंतप्रधान केयर स्ट्रॅमर यांनी प्राधान्य दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
Posted On:
24 JUL 2024 10:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त पंतप्रधान केयर स्ट्रॅमर यांनी दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि दृढ करायला प्राधान्य दिल्या बद्दल त्यांची प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी यांनी युनायटेड किंगडमचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"UK FS @DavidLammy यांना भेटून आनंद झाला. PM @Keir_Starmer यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी व्यापक आणि दृढ करायला प्राधान्य दिल्या बद्दल प्रशंसा करत आहे. हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. द्विपक्षीय तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम आणि परस्पर फायद्याचा एफटीए पूर्ण करण्याच्या इच्छेचे स्वागत आहे."
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2036609)
Visitor Counter : 102
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam