अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणारी योजना सुरू, पंतप्रधानांच्या पॅकेज अंतर्गत ही पाचवी योजना


5 वर्षांत 1 कोटी युवकांना 500 आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी

6,000 रूपयांच्या एक वेळ मदतीसह प्रति महिना 5,000 रूपये इंटर्नशिप भत्ता मिळणार

Posted On: 23 JUL 2024 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2024

 

आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एक सर्वसमावेशक योजना सुरू करणार आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत ही 5 वी योजना असेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करताना ही योजना जाहीर केली. या व्यापक योजनेद्वारे  5 वर्षांत 500 आघाडीच्या कंपन्यांमध्ये 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल. त्यांना प्रत्यक्षातील व्यावसायिक वातावरणात वर्षभर विविध व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

प्रति महिना  5,000 इंटर्नशिप भत्ता मिळेल आणि  6,000 रूपयांची एकवेळ मदत दिली जाईल. कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून (सीएसआर) प्रशिक्षण खर्च आणि इंटर्नशिपचा 10 टक्के खर्च करायचा आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2036094) Visitor Counter : 88