अर्थ मंत्रालय
वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद
राज्य सरकारांद्वारे पायाभूत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकालीन व्याजमुक्त कर्जासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद
25,000 ग्रामीण वस्त्यांना सर्व प्रकारच्या हवामानाला अनुकूल कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा सुरू करण्यात येणार
Posted On:
23 JUL 2024 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2024
पायाभूत सुविधांची उभारणी आणि सुधारणांचा अर्थव्यवस्थेवरील गुणात्मक प्रभाव लक्षात घेत, केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. ही तरतूद देशाच्या जीडीपीच्या 3.4 टक्के असेल. आगामी 5 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांसाठी मजबूत आर्थिक पाठबळ कायम ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असे वित्तमंत्री म्हणाल्या.
पायाभूत सुविधांसाठी त्याच प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी दीर्घकालीन व्याजमुक्त कर्जासाठी 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद घोषित केली. यामुळे राज्यांना त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी संसाधनांचे वाटप करण्यात मदत मिळेल.
लोकसंख्या वाढीमुळे पात्र ठरलेल्या 25,000 ग्रामीण वस्त्यांना सर्व प्रकारच्या हवामानात तग धरेल अशी कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी, वित्तमंत्र्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.

सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या अनेक राज्यांना वित्तीय सहाय्य आणि मदत जाहीर केली.
बिहारमध्ये वारंवार उद्भवणारी पूरस्थिती लक्षात घेऊन, वित्तमंत्र्यांनी कोसी-मेची आंतर-राज्य लिंक आणि 20 इतर चालू आणि नवीन योजना यांसारख्या सुमारे 11,500 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य जाहीर केले.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2036062)
Visitor Counter : 137
Read this release in:
English
,
Telugu
,
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati