निती आयोग
नीती आयोग 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवणार 'संपूर्णता अभियान'
देशभरातील आकांक्षी जिल्हे आणि आकांक्षी प्रभागांमध्ये चिन्हित 6 निर्देशकांची पूर्तता करण्याचे अभियानाचे उदिष्ट
Posted On:
03 JUL 2024 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2024
नीती आयोग 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी 'संपूर्णता अभियान', ही तीन महिन्यांची मोहीम सुरु करत आहे. देशभरातील आकांक्षी जिल्ह्यांमध्ये 6 प्रमुख निर्देशक आणि आकांक्षी प्रभागांमधील 6 प्रमुख निर्देशकांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सातत्त्यपूर्ण प्रयत्नांचा हा भाग आहे.
‘संपूर्णता अभियान’ आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि आकांक्षी प्रभाग कार्यक्रमांतर्गत, 112 आकांक्षी जिल्हे आणि 500 आकांक्षी प्रभागांमध्ये चिन्हित 6 निर्देशकांपैकी प्रत्येकामध्ये निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
‘संपूर्णता अभियान’ सर्व आकांक्षी प्रभागांमध्ये चिन्हित पुढील 6 KPI वर लक्ष केंद्रित करेल:
- गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- प्रभागातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी
- प्रभागातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी.
- ICDS कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- मृदा नमुना संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी.
- प्रभागातील एकूण बचत गटांच्या तुलनेत फिरते भांडवल मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी.
‘संपूर्णता अभियाना’ अंतर्गत आकांक्षी जिल्ह्यांमधील चिन्हित 6 KPI पुढील प्रमाणे:
- गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजी साठी (ANC) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- ICDS कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- लसीकरण पूर्ण झालेल्या बालकांची टक्केवारी (9-11 महिने) (बीसीजी+डीपीटी3+ओपीव्ही3+गोवर 1)
- वाटप केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची संख्या
- माध्यमिक स्तरावर कार्यरत विद्युत पुरवठा असलेल्या शाळांच्या संख्येची टक्केवारी
- शालेय वर्ष सुरू झाल्यावर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके देणाऱ्या शाळांच्या संख्येची टक्केवारी
नीती आयोग ‘संपूर्णता अभियान’ राबवण्यासाठी जिल्हे आणि विभागांनी आयोजित करण्याच्या उपक्रमांची यादी उपलब्ध करून देत आहे. अभियानाची गती कायम राखण्यासाठी व त्यातील सहभाग वाढवण्याच्या हेतूने जिल्हे आणि विभागांना जनसंपर्काची व्याप्ती वाढवतील अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
अभियान यशस्वी करून त्याचे ठोस परिणाम प्रत्यक्षात दिसून यावेत यासाठी:
- जिल्हे/विभाग सहा मानकांवर संपृक्तता गाठण्यासाठी त्रैमासिक कृती आराखडा तयार करतील
- जिल्हे/विभाग संपृक्ततेच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीची मासिक पाहणी करतील
- जागरूकता आणि वागणुकीत बदलाच्या हेतूने उपक्रमांची अंमलबजावणी करतील
- जिल्हास्तरीय अधिकारी उपक्रम चालू असताना क्षेत्रभेटी देऊन देखरेख ठेवतील
नीती आयोग, संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तसेच राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांच्या सहयोगाने जिल्हे आणि विभागांच्या परिणामकारक व गतिमान विकास साध्य करण्यासाठी काम करणार आहे. या सहयोगाचा भर सुधारित आखणी व अंमलबजावणी, क्षमता बांधणी आणि वाढीव, शाश्वत सेवा पुरवठ्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर असेल.
आकांक्षी जिल्हे आणि विभाग कार्यक्रमाविषयी:
वर्ष 2018 मध्ये सुरू केलेल्या आकांक्षी जिल्हे कार्यक्रम (एडीपी) अंतर्गत 112 जिल्ह्यांचा समावेश आहे. देशाच्या दुर्गम भागात असलेल्या व तुलनेने मागास राहिलेल्या जिल्ह्यांचा वेगाने विकास साध्य करण्याचा एडीपीचा उद्देश आहे.
Aspirational Districts Programme
|
Aspirational Blocks Programme
|
Launched in January 2018 by Hon’ble Prime Minister
|
Launched in January 2023 by Hon’ble Prime Minister
|
Aims to quickly and effectively transform 112 districts across the country
|
Aims for saturation of essential government services in 500 Blocks (329 Districts) across the country
|
Focuses on five themes:
- Health & Nutrition
- Education
- Agriculture & Water Resources
- Financial Inclusion & Skill Development
- Infrastructure
|
Focuses on five themes:
- Health & Nutrition
- Education
- Agriculture and Allied Services
- Basic Infrastructure
- Social Development
|
Progress in measured on 81 indicators of development
|
Progress is measured on 40 indicators of development
Block Profile can be accessed from here.
|
* * *
S.Kane/Rajshree/Reshma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030830)
Visitor Counter : 168
Read this release in:
Bengali
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Nepali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada