पंतप्रधान कार्यालय

अँटोनियो कोस्टा यांची युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 28 JUN 2024 8:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँटोनियो कोस्टा यांची युरोपीय परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

माझे स्नेही @antoniolscosta यांचे युरोपीय परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन. भारत-युरोप 🇮🇳🇪🇺 धोरणात्मक भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029413) Visitor Counter : 51