पंतप्रधान कार्यालय
निरनिराळ्या संस्कृती आणि पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र आणणारा योग म्हणजे एकताकारक बळ आहे- पंतप्रधान
Posted On:
21 JUN 2024 9:15PM by PIB Mumbai
दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जगभरच्या व्यक्ती, समुदाय आणि संघटनांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात योगसाधना करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. योगाच्या लोकप्रियतेसाठी झटणाऱ्या सर्वांप्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान म्हणतात-:
"जगभर मोठ्या प्रमाणात दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाला, त्याबद्दल व्यक्ती, समुदाय आणि संघटनांनी एकत्रितपणे योगसाधना करत सामूहिक प्रयत्न केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. निरनिराळ्या संस्कृती आणि पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र आणणारा योग म्हणजे एकताकारक बळ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. योगसत्रांमध्ये तरुणाईचा एवढा उत्साही आणि समर्पणभावनेने सहभाग मिळत असलेला पाहून आनंद होतो.
योगाच्या लोकप्रियतेसाठी झटणाऱ्या सर्वांप्रती मी कृतज्ञ आहे. एकता आणि सुसंवाद प्रस्थापित करण्याच्या प्रवासात हे प्रयत्न अत्यंत लाभकारक आणि उपकारक ठरतील. योगसाधना करण्यासाठी इतरांना प्रेरणा देणाऱ्या कुशल आणि महत्त्वाकांक्षी योगशिक्षकांच्या संख्येत वाढ होत असल्याचाही मला अतिशय आनंद होतो.
आगामी काळात जगाला एकत्र आणण्यासाठी योग सातत्याने कार्यरत राहो, हीच सदिच्छा"
***
S.Kakade/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027831)
Visitor Counter : 90
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam