माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान-2024 ची घोषणा

Posted On: 11 JUN 2024 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B) तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान-2024 ची घोषणा केली आहे. भारतात आणि परदेशात योगसाधनेचा संदेश पोहोचवण्यासाठी मंत्रालयाने जून 2019 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान(AYDMS) ची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम  सन्मान-2024 अंतर्गत मुद्रित, दूरचित्रवाणी आणि रेडियो या तीन प्रमुख श्रेणींमध्ये 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये 33 सन्मान देण्यात येणार आहेतः

1. 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये “वर्तमानपत्रातील योगविषयक सर्वोत्तम वार्तांकन” या श्रेणी अंतर्गत 11 सन्मान देण्यात येणार आहेत.

2. 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये, “ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये(टीव्ही) सर्वोत्तम वार्तांकन” या श्रेणीत  11 सन्मान देण्यात येणार आहेत.

3. 22 भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये, “ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये(रेडियो) योगविषयक सर्वोत्तम वार्तांकन” या श्रेणीत  11 सन्मान देण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिवस

दरवर्षी 21 जून रोजी साजऱ्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाने आरोग्य आणि निरामयतेला चालना देणारी लोकचळवळ जगभरात निर्माण केली आहे. योगसाधनेचे महत्त्व भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर पटवून देण्यामध्ये प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणूनच या प्राचीन पद्धतीला आणि तिच्या अगणित लाभांना लोकप्रिय  करण्यात आणि प्रसार करण्यात प्रसारमाध्यमांचे प्रचंड सामर्थ्य आणि जबाबदारी यांचा सन्मान करणे गरजेचे आहे.

एवायडीएमएस शिफारशी आणि मार्गदर्शक तत्वे

एक विशेष पदक/पट्टिका/ट्रॉफी आणि स्मृतिचिन्ह असे सन्मान या पुरस्काराचे स्वरुप असून एका स्वतंत्र परीक्षकाकडून त्याची शिफारस केली जाते. हे पुरस्कार मुद्रित, रेडियो आणि टेलिव्हिजन क्षेत्रात असलेल्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी/परवानगी असलेल्या सर्व प्रसारमाध्यम संस्था/ कंपन्यांसाठी खुले आहेत.

मार्गदर्शक तत्वांनुसार प्रसारमाध्यम संस्था त्यांच्या नामांकनाचा तपशील 12 जून 2024 ते 25 जून 2024 दरम्यान निर्मित आणि प्रकाशित लेखाच्या/लेखांच्या संबंधित क्लिपिंग्ज किंवा प्रसारित/प्रक्षेपित ऑडियो/व्हिज्युअल आशय यांच्यासोबत सादर करू शकतात. या प्रवेशिका पाठवण्यासाठी 8 जुलै 2024 ही अंतिम तारीख आहे. मार्गदर्शक तत्वांचा तपशील पत्र सूचना कार्यालयाच्या वेबसाईटवर (https://pib.gov.in/indexd.aspx) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (https://mib.gov.in/sites/default/files/AYDMS%20Guidelines%202024_0.pdf ) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2024431) Visitor Counter : 74