पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून पदभार स्वीकारला
Posted On:
11 JUN 2024 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
भूपेंद्र यादव यांनी आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रीपदीचा कार्यभार स्वीकारला.
ही संधी दिल्याबद्दल यादव यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि आपण मंत्रालयातील आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या निभावण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. त्यांचे सहकारी राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांचेही यादव यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या मंत्रालयाने गेल्या 10 वर्षांत अनेक पावले उचलली आहेत तसेच पर्यावरण आणि विकासाची सांगड घालत सरकार पुढे जात असल्याचे ते म्हणाले. मिशन लाइफ- लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट सारख्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाईल असेही ते म्हणाले.
हवामान बदलाच्या वाढत्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधानांनी “एक पेड़ माँ के नाम” हा वृक्षारोपण उपक्रम देखील सुरू केल्याचे सांगत वृक्षलागवडीच्या या उपक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे वाढते तापमान, वाळवंटीकरण आणि जैव विविधतेसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत होईल.
(Release ID: 2024233)
Visitor Counter : 90
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam