पंतप्रधान कार्यालय
कतारच्या अमीरांनी पंतप्रधानांचे दूरध्वनीवरून केले अभिनंदन
त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि भारतीय जनतेप्रती त्यांच्या सकारात्मक भावनांबद्दल पंतप्रधानांनी मानले आभार
भारत-कतार संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेला दोन्ही नेत्यांनी दिला दुजोरा
पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2024 मधील कतार भेटीची आठवण करून दिली आणि कतारच्या अमीरांना भारत भेटीसाठी दिलेल्या मंत्रणाचा केला पुनरुच्चार
पंतप्रधानांनी महामहिम अमीरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच ईदच्या शुभेच्छा दिल्या
Posted On:
10 JUN 2024 9:24PM by PIB Mumbai
कतारचे अमीर, महामहिम शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी दूरध्वनीवरून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
अमीरांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय जनतेप्रति त्यांच्या
सकारात्मक भावनांबद्दल त्यांचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि कतारमधील मैत्रीपूर्ण आणि बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.
पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2024 मधील कतारच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण भेटीची आठवण करून दिली आणि कतारच्या अमिरांना लवकरच भारताला भेट देण्याच्या निमंत्रणाचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी अमीर यांना वाढदिवसानिमित्त तसेच आगामी ईद-उल-अदहानिमित्त शुभेच्छा दिल्या.
***
NM/GajendraD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023985)
Visitor Counter : 84
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam