पंतप्रधान कार्यालय
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन
गेल्या दशकभरात दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय कामगिरीची दोन्ही नेत्यांनी घेतली नोंद
दोन्ही देशांमध्ये आणखी बळकट भागीदारी यापुढेही सुरु ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली उत्सुकता
Posted On:
05 JUN 2024 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला मिळालेल्या विजयाबद्दल बांग्लादेश प्रजासत्ताकाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांना अभिनंदनपर दूरध्वनी करून बातचीत केली.
पंतप्रधान मोदी यांचे सर्वात आधी अभिनंदन करणाऱ्या काही नेत्यांमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांचा समावेश असून यातून दोन्ही नेत्यांमध्ये असलेले स्नेहपूर्ण आणि व्यक्तिगत संबंध प्रतिबिंबित झाले आहेत.
विकसित भारत 2047 आणि स्मार्ट बांग्लादेश 2041 या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नव्याने निश्चित केलेल्या नियमावलीचे पालन करत दोन्ही देशांमध्ये असलेले ऐतिहासिक आणि दृढ संबंध आणखी मजबूत करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करत राहण्याचे वचन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिले.
गेल्या दशकभरात दोन्ही देशांतील सामान्य लोकांच्या जीवनमानात झालेल्या लक्षणीय सुधारणांची नोंद घेत दोन्ही नेत्यांनी यापुढील काळात आर्थिक आणि विकासात्मक भागीदारी, उर्जा सुरक्षा, डिजिटल संपर्क तसेच दोन्ही देशांच्या जनतेतील परस्पर संबंधांसह एकूणच दळणवळण सुविधा यांच्यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तानात्मक भागीदारी आणखी सुधारण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली.
* * *
NM/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2023083)
Visitor Counter : 100
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam